top of page
कोथमिरे मसाले
कोथमिरे त्रिशूल छाप मसाले – चवीला खरे कोथमिरे
व्यावसायिक मूल्यांना प्राधान्य देत शुद्धता, प्रामाणिकता, सचोटी यांची कास न सोडता मसाल्यांमध्ये एक आघाडीचे नाव म्हणजे कोथमिरे त्रिशूल छाप मसाले. चवीचे सातत्य आणि उच्च दर्जाच्या घटक पदार्थांच्या वापरामुळे गेली २८ वर्षे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले नाव म्हणजे कोथमिरे त्रिशूल छाप मसाले.
श्री सुभाष पांडुरंग कोथमिरे यांनी या व्यवसायाची सुरुवात ४ एप्रिल १९९२ रोजी, संगमनेर मध्ये केली. सुरुवातीपासूनच श्री. सुभाष कोथमिरे यांचा मसाल्यांची शुद्धता राखण्यावर भर आहे . त्यामुळे रीफाइंड तेल न वापरता रसायान विरहित शेंगदाणा तेल मसाल्यांमध्ये वापरले जाते. त्याचा परिणाम म्हणून घटक पदार्थांची मूळ गुणवत्ता अबाधित राहून उपयुक्तता टिकून राहते. उच्च प्रतीचे स्वच्छ घटक पदार्थ आणि मालाची गुणवत्ता यामुळे ज्या ज्या भागात लोकांनी मसाले वापरले त्या त्या भागातून मसाल्यांची मागणी अजूनच वाढली.
अथक परिश्रम आणि चिकाटी या गुणांबरोबर प्रामाणिकपणा व ग्राहक, दुकानदारांशी प्रस्थापित केलेले संबंध यामुळे अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये कोथमिरे त्रिशूल छाप मसाल्यांनी ग्राहकांच्या मनामध्ये पसंतीचं स्थान निर्माण केलं आहे. धना पावडर, मिरची पावडर, हळद पावडर आणि निवडलेला उत्तम प्रतीचा जीरा जो एकदा वापरतो तो वारंवार हीच उत्पादने वापरतो. संडे स्पेशल मसाला (मिक्स गरम मसाला) हे खास वैशिष्ट्य. हा एकच मसाला व्हेज आणि नोन-व्हेज पदार्थांना वापरता येतो. मिसळ, पावभाजी, चिकन, मटण रस्सा, भाजी वगैरे पदार्थांना हा एकच मसाला रुचकर आणि
स्वादिष्ट बनवतो. महाराष्ट्रातील विविध खान-पान पद्धती, आवड-निवड यांच्या पसंतीला खरा उतरलेला आणि म्हणूनच सर्वाधिक विकला जाणारा मसाला म्हणजे संडे स्पेशल मसाला.
संपूर्ण महाराष्ट्रभर आणि परदेशात सुद्ध्या मराठी माणसांच्या सेवेला कोथमिरे त्रिशूल छाप मसाले सज्ज आहेत. ग्राहकांनी अनुभव घेऊन पाहावा. कारण - चवीला खरे कोथमिरे
Kothmire Trishul Brand Masale
Masala is the key component in Indian cuisine. There are many ingredients in making of a masala which makes it the key component in Indian cuisine. Kothmire Trishul Brand Masale is the leading name in Maharashtra. This brand is known for its ethical business practices, transparency and professionalism. The efforts of past 28 years in maintaining the consistency in the taste and by using high quality ingredients, the brand has carved out its place in the market. Shri. Subhash Pandurang Kothmire, founded this company in the year 1992 in Sangamner (Maharashtra). From the very first day, the founder of the company has kept a very close eye maintaining the purity of the product. Use of chemical free filtered ground nut oil instead of refined oil results in retaining the original properties of the ingredients at the same time imparts stability to the product. The use of clean and assorted ingredients helps to maintain the high quality standard of the product. This resulted in the increased demands making inroads in the newer markets.
With Persistent efforts, steadfastness, transparency along with the customer centric approach and cordial relationship with dealers, the company now has created its strong presence and place in market in Nashik, Ahmednagar and Pune districts. Dhana Powder, Mirchi Powder, Haldi powder and assorted good quality Jeera compels one to use these products repeatedly. Sunday Special Masala (Mix Garam Masala) is a flagship product. This can be used for veg and non-veg both the recipes. Misal, Pav-bhaji, chicken-Mutton rassa and other recipes which makes it tasty and delicious. It has stood the test of the variety of tastes in Maharashtra and hence has become a number one selling product.
Kothmire Trishul Brand Masale is committed to serve its customers in Maharashtra and world-wide with its range of products. Experience the taste.
bottom of page